Join us
Daily Top 2Weekly Top 5

Unholy! मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला अंघोळ करतानाचा फोटो, नेटकरी म्हणतात, 'तुमच्यामुळे मुली...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:50 IST

मराठी अभिनेत्रीने चक्क अंघोळ करतानाचाच पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे.

सध्या सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करणं फारच सामान्य झालं आहे. मात्र हेच मराठी अभिनेत्रींनी केलं तर नेटकऱ्यांचा पाराच चढतो. याचा अनुभव अनेक आघाडीच्या मराठी अभिनेत्रींना आला आहे. मग अगदी स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर त्यांच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल झाल्या आहेत. दरम्यान नुकतेच एका मराठी अभिनेत्रीने चक्क अंघोळ करतानाचाच पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. सुपरबोल्ड असा हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, अरे हे काय!

तर हा फोटो आहे अभिनेत्री मिताली मयेकरचा. मितालीने स्वत:च तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो नुकताच पोस्ट केला आहे. सध्या मिताली मध्य प्रदेश येथे आहे. मध्य प्रदेशच्या कान्हा नॅशनल पार्कमध्ये तिने जंगल सफारीचा आनंद घेतला. त्याचे फोटो व्हिडिओ तिने काही दिवसांपूर्वीच शेअर केले होते. आता सफारीदरम्यान ती जिथे राहत होती त्या हॉटेलमधला हा फोटो दिसतोय. हे ओपन बाथरुम दिसत आहे जिथे मिताली शॉवरखाली अंघोळ करत आहे. मोकळे केस आणि हात वर करत मितालीने पोज दिली आहे. हा पाठमोरा फोटो आहे. 'अनहोली'(Unholy) असं कॅप्शन तिने पोस्टला दिले आहे. अर्थात आता फोटोंवर कमेंट्सचा भडिमार होणारच. काही क्षणातच तिचा हा न्यूड फोटो व्हायरल झाला आहे.

मितालीने हा न्यूड फोटो पोस्ट करताच खाली नेटकऱ्यांच्या कमेंट्स सुरु झाल्या आहेत. काही युझर्सला फोटो खूपच आवडला असून त्यांनी कौतुक केले आहे. 'नाईस क्लिक', 'खास' अशा कमेंट्स केल्या आहेत. पण अनेक जणांनी अपेक्षेप्रमाणे ट्रोलिंग सुरु केले आहे. 'लाजा सोडल्या म्हणूनच तुमच्यामुळे मुली सुरक्षित नाही' अशी टीका एकाने केली आहे. 'पावसाळ्यात अशा ठिकाणी अंघोळ कशी करायची', 'अंघोळ करायला एवढ्या दूर कोणी जाते का' अशा भन्नाट कमेंटही या पोस्टवर आल्या आहेत.

मितालीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. नुकतीच तिने 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत भूमिका साकारली होती. सध्या मिताली नवरा सिद्धार्थ चांदेकरसोबत संसारात व्यस्त आहे. दोघांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

 

टॅग्स :मिताली मयेकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेताव्हायरल फोटोज्