Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतच्या वाढदिवसाला होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, 'तुझ्या सुंदर हास्यासारखंच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:32 IST

सिद्धेशने लेडी लव्हसाठी शेअर केली पोस्ट

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant)आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. पूजासाठी हा वाढदिवस जास्त स्पेशल आहे. कारण काही दिवसांपूर्वीच पूजाने तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनचा खुलासा करत साखरपुडाही केला. सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavhan) पूजाची एन्गेजमेंट झाली. त्यांचं समुद्रकिनाऱ्यावरील रोमँटिक फोटोशूट व्हायरल झालं. आज आपल्या लेडी लव्हच्या वाढदिवसासाठी सिद्धेशने खास पोस्ट शेअर केली आहे. शिवाय पूजानेही अगदी गोड प्रतिक्रिया दिली आहे.

पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाणने इन्स्टाग्रामवर दोन सुंदर फोटो शेअर केलेत. यामध्ये पूजा आणि सिद्धेशने कोझी फोटो शेअर केला आहे. तसंच त्यांच्यासमोर केक ठेवला आहे. पूजाने सिद्धेशच्या मिठीत असून अतिशय रोमँटिक झाली आहे. तर दुसऱ्या फोटोत पूजा केक कापताना दिसत आहे. या फोटोंसोबत सिद्धेशने लिहिले, "आजच्या खास दिवशी मी देवाचे आभार मानेल की त्याने आमची भेट घडवली. तू नेहमीच आपल्या नात्यात स्ट्राँग बाँड राहिली आहेस. तुझ्या सुंदर हास्याप्रमाणेच तुझा आजचा दिवस आणि येणारं वर्ष जावो. वाढदिवसाच्या शुभेच्छा लव्ह."

सिद्धेशने दिलेल्या या प्रेमळ शुभेच्छांवर पूजा सावंतनेही प्रतिक्रिया दिली आहे. ती लिहिते, "तुझे शब्द...थँक यू सो मच सिड, तुझ्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. आपल्या दोघांच्या यापुढील अशाच सुंदर क्षणांची मी आतुरतेने वाट पाहत आहे."

सिद्धेश आणि पूजा यावर्षी लग्नगाठ बांधतील अशी शक्यता आहे. सध्या दोघंही लग्नाआधीचा हा रोमँटिक वेळ एन्जॉय करत आहेत. सिद्धेश ऑस्ट्रेलियात स्थायिक असून पूजा लग्नानंतर कुठे स्थायिक होणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र सिद्धेश काही वर्षांसाठीच ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाला असून नंतर तो मुंबईतच येणार असल्याचं तिने अलीकडेच स्पष्ट केलं.

टॅग्स :पूजा सावंतमराठी अभिनेतासोशल मीडिया