Join us

मराठी अभिनेत्री पतीसह तुळजाभवानी आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाला, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:47 IST

अभिनेत्री नेहा पेंडसे नववर्षाच्या सुरुवातीला देवदर्शनाला गेली आहे. नेहाने पतीसह तुळजाभवानी आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.

२०२५ हे नवं वर्ष नुकतंच सुरू झालं आहे. सरत्या वर्षाला निरोप देत सगळ्यांनी जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं. सेलिब्रिटींनी थर्टी फर्स्टला जंगी पार्टी केली. नव्या वर्षाचे नवे संकल्प करत कलाकारांनी नववर्षाची सुरुवात केली. तर मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे नववर्षाच्या सुरुवातीला देवदर्शनाला गेली आहे. नेहाने पतीसह तुळजाभवानी आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. 

नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन देवदर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. नेहाने पतीसह सोलापुरची तुळजाभवानी आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेत नव्या वर्षाची भक्तिमय सुरुवात केली. यावेळी नेहा पारंपरिक पेहरावात दिसून आली. तिने लाल रंगाची साडी नेसली होती. "आई तुळजा भवानी अन् स्वामी समर्थांचे वार्षिक दर्शन सुंदर घडले तर! खऱ्या अर्थाने आता नवीन वर्षाची सुरवात झाली", असं नेहाने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. 

नेहाने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. मे आय कम इन मॅडम? या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. काही हिंदी सिनेमांमध्येही ती दिसली आहे. २०२० मध्ये नेहाने बिजनेसमॅन शार्दुल सिंगसह लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :नेहा पेंडसेटिव्ही कलाकार