Join us

'आयुष्य कसं मॅनेज करू?', वैतागलेल्या मितालीची 'ती' पोस्ट नेमकी कोणासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:33 IST

Mitali mayekar: 'कृपया मला एकटीला राहू द्या', असंही मितालीने या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे.

मराठी कलाविश्वातील कायम चर्चेत येत असलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (mitali mayekar). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी ही जोडी त्यांच्या अफलातून केमिस्ट्रीमुळेही चर्चेत येत असते. हे दोघंही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून कायम एकमेकांविषयीची पोस्ट शेअर करत असतात. यात अलिकडेच मितालीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत येत आहे.

मितालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिचे केस मोकळे सोडले असून या पोस्टला दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. “मी माझे केस देखील नीट मॅनेज करू शकत नाही, तर मग मी माझं आयुष्य कसं मॅनेज करू?”, असं कॅप्शन मितालीने या फोटोला दिलं आहे. सोबतच बेसिक लाइफ प्रॉब्लेम असा हॅशटॅगही तिने दिला आहे.

दरम्यान, मितालीच्या या फोटोवर अनेक जण कमेंट करत असून एका चाहत्याला तिने रिप्लायही दिला आहे. ‘ही सर्व कमाल ताक पिण्याची आहे’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यावर ‘कृपया मला एकटीला राहू द्या’, असा रिप्लाय दिला मितालीने दिला आहे. 

टॅग्स :मिताली मयेकरसेलिब्रिटीसिनेमासिद्धार्थ चांदेकर