Join us

"मुंबईवर माझं प्रेम, पण तरीही... ", वाढत्या वायू प्रदूषणामुळे मनवा नाईक त्रस्त; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:40 IST

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी ओळख असलेली मनवा नाईक हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय असं नाव आहे.

Manava Naik: अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी ओळख असलेली मनवा नाईक (Manava Naik) हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय असं नाव आहे. अनेक गाजलेल्या टिव्ही मालिका, नाटक तसेच चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. वेगवेगळ्या आशयघन मालिकांची निर्मिती करत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अभिनेत्री मनवा नाईक आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे देखील अनेकदा चर्चेत येते. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.

सध्या मुंबई शहरातील वायू प्रदूषणाचा प्रश्न जटिल होत असून दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली आहे. या समस्येबद्दल मनवा नााईकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हटके व्हिडीओ शेअर करत शाब्दिक फटकेबाजी केली आहे. "मुंबईवर माझं प्रेम, पण तरीही... " असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान, अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "मी इन्स्टाग्रावर एका परदेशी महिलेला फॉलो केलं आहे. त्या अशा छान स्वेटर घालून असतात जवळपास त्या ७० वर्षांच्या आहेत. "सगळ्यांना नमस्कार, न्यूयॉर्क सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे, असं त्या म्हणतात." तर मी म्हटलं आपण सुद्धा असं रिल करावं."

यापुढे अभिनेत्री म्हणते, म्हणून मी बाल्कनीत गेले. "नाईन पीएम वेलकम टू मुंबई सिटी...", असं मनात म्हटलं, आणि खिडकीच्या बाहेर दाखवलं. न्यूयॉर्क सिटीमध्ये दिवे, बिल्डिंग वगैरे आणि आपल्याकडे कन्स्ट्रक्शन साईट, धूळ, धूर आणि ठसकाच लागला."असं म्हणत अभिनेत्रीने वायू प्रदूषणाबद्दल आपलं मत मांडलं आहे. शिवाय चिंता देखील व्यक्त केली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीमुंबईसोशल मीडियावायू प्रदूषण