Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुशबू तावडेने शेअर केला क्यूट फॅमिली फोटो; पाहा अभिनेत्रीचं त्रिकोणी कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:16 IST

Kushboo tawde: खुशबूने २ नोव्हेंबर २०२१ मध्ये एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला. खुशबूचं बाळ आता पाच महिन्यांचं झालं असून त्याचं नाव राघव ठेवलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे (khushboo tawde). काही दिवसांपूर्वीच खुशबूने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे एकेकाळी अभिनयामुळे चर्चेत येणारी खुशबू सध्या तिच्या बाळामुळे चर्चेत येत आहे. खुशबू अनेकदा तिच्या बाळाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने तिच्या त्रिकोणी कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची हॅप्पी फॅमिली दिसून येत आहे. 

खुशबूला बाळ झाल्यापासून या चिमुकल्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. त्यामुळे खुशबूने तिच्या बाळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच तिच्या त्रिकोणी कुटुंबाचा फोटो चर्चेत येत आहे. या फोटोमध्ये खुशबू, तिचं बाळ आणि नवरा अभिनेता संग्राम साळवी (sangram salvi) दिसून येत आहे.

दरम्यान, खुशबूने २ नोव्हेंबर २०२१ मध्ये एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला. खुशबूचं बाळ आता पाच महिन्यांचं झालं असून त्याचं नाव राघव ठेवलं आहे. खुशबू आणि संग्राम मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी 'देवयानी' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. खुशबू 'एक मोहोर अबोल', 'देवयानी', 'पारिजात', 'धर्मकन्या', 'मेरे साई', 'तेरे बिन', 'आम्ही दोघी', अशा काही  हिंदी मराठी मालिकेत झळकली आहे.

टॅग्स :संग्राम साळवीसेलिब्रिटीटेलिव्हिजन