Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलींची आई असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचा साडीतील फोटो पाहून म्हणाल लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 07:00 IST

सोशल मीडियावरील फोटोंमुळे ही अभिनेत्री असते चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आतापर्यंत अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. आजही कोंबडी पळाली तंगडी धरून हे कानावर पडलं की क्रांतीचा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागतो. क्रांती आता सिनेइंडस्ट्रीत तितकीशी सक्रीय नाही. मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिथून चाहत्यांसोबत संपर्कात असते. तसेच ती फोटोदेखील शेअर करत असते. नुकताच तिने साडीतील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे.क्रांती रेडकर हिने नुकताच साडीतील फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोला खूप लाइक्स मिळत आहे.

क्रांतीने मार्च २०१७मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेसोबत लग्न केले. क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत.

'जत्रा' सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं 'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली.

अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. गेल्या महिन्यात तिचा रॉकी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :क्रांती रेडकर