Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लोखंडी जिन्यावरुन पडली अन्...", क्रांती रेडकरने सांगितला सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला किस्सा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:27 IST

"तुटलेला हात धरुन...", क्रांती रेडकरने सांगितला सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला 'तो' किस्सा, काय घडलेलं?

Kranti Redkar : कितीही अडथळे आले तरी शो मस्ट गो ऑन, हे असं चॅलेंजिंग स्टेटमेंट बरीच मेहनती, जिद्दी मंडळी करत असतात कारण त्यांचं त्यांच्या कामाप्रती एक कर्तव्य असण्याची, जबाबदारी असण्याची भावना त्यांच्या मनात असते. अशाच एका मराठी अभिनेत्रीने हाताला दुखापत झालेली असताना नाटकाचा प्रयोग न थांबवता काम सुरु ठेवलं. त्या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पठारे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री क्रांती रेडकरने याचा किस्सा शेअर केला आहे. 

नुकतीच क्रांती रेडकरने 'मिरची मराठी'च्या गप्पांची मिसळ या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "आम्ही 'तू तू मैं मैं' हे नाटक करत होतो. त्यामध्ये विजय चव्हाण, भरत जाधव, अंकुश चौधरी मी आणि सुप्रिया पाठारे होतो. तेव्हा आमचे लागोपाठ तीन शो असायचे. शिवाय तेशो हाऊसफुल्ल देखील असायचे. त्या नाटकात विजय चव्हाण १४ ते १७ भूमिका करायचे आणि ते ओका शोमध्ये ३३ वेळा कपडे बदलायचे. त्यानंतरही त्यांच्यामध्ये एनर्जी असायची. त्यावेळी नाटकादरम्यान, लोखंडी जिन्यावरून सुप्रिया पाठारे पडली. तिचा हात मोडला."

त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "तेव्हा मग आम्ही नाटकाचा प्रयोग थांबवला आणि प्रेक्षकांमध्ये कोणी डॉक्टर आहे का असं विचारलं. तेव्हा ते डॉक्टर आले त्यांनी तिचा हात दुखू नये म्हणून टॉवेलसारखी शॉल तिच्या हाताला बांधली. त्यावेळी आम्ही प्रेक्षकांना विनंती केली की, तुमची इच्छा असेल तर आम्ही पुढे प्रयोग सुरु ठेवतो पण आता सुप्रियाला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे."

तुटलेला हात धरुन अखंड प्रयोग केला...

"त्यावेळी सुप्रिया म्हणाली की नाही, मी प्रयोग पूर्ण करुनच हॉस्पिटलला जाणार. तिने नाटकावेळी तुटलेला हात धरुन अखंड प्रयोग केला. त्यावेळी नाटकादरम्यान तिला आठवेळा कॉस्ट्यूम बदलावा लागला होता. मी माझं सगळं सांभालून तिच्याकडे बघायचे. कारण तेव्हा बॅकस्टेजला महिला नव्हत्या. आम्ही तो शो कसा केला हे आम्हालाच माहित. त्यानंतर तिच्या हाताला प्लास्टर असताना आम्ही पुढचे चाळीस दिवस नाटकाचे प्रयोग केले. मला असं वाटतं नाटक तुम्हाला माणूस म्हणून तुम्ही एकमेकांसाठी कसं उभं राहिलं पाहिजे. हेही तुम्हाला नाटक शिकवतं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.  

टॅग्स :क्रांती रेडकरमराठीसेलिब्रिटी