Join us  

अभिनेत्री किशोरी शहाणे यांची स्वप्नपूर्ती; खरेदी केली नवी कोरी गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:05 PM

किशोरी शहाणे यांनी आलिशान गाडी खरेदी केली आहे

गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना गुड न्यूज देत आनंदाचा धक्का दिला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दुबईत नवीन घर घेतलं. ठरलं तर मग फेम अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी, अभिनेत्री मिताली मयेकर, अपूर्वा गोरे यांनी नवीन गाडी खरेदी केली. त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. अशात आता या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. या अभिनेत्री आहेत किशोरी शहाणे.  

किशोरी शहाणे यांनी आलिशान गाडी खरेदी केली आहे. त्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर त्यांनी शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहले, 'आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री'. व्हिडीओमध्ये किशोरी शहाणे यांच्यासोबत त्यांचा मुलगा बॉबीही दिसत आहे. किशोरी यांनी आपल्या नव्या गाडीची पूजा केली आणि केक कापून सेलिब्रेशनही केलं.  चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 

किशोरी शहाणे हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये किशोरी शहाणे झळकल्या आहेत.  आजही किशोरी शहाणे कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. नुकत्याच सुरू झालेल्या 'कैसे मुझे तुम मिल गये' या मालिकेत त्या नायकाच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

टॅग्स :किशोरी शहाणेसेलिब्रिटीमराठी अभिनेताकार