Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री गिरीजा ओकच्या पायाला दुखापत, हॉस्पिटलमध्ये झाली दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाली.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:07 IST

पायाला प्लास्टर अन् हातात कुबड्या...; गिरीजा ओकची अवस्था पाहून चाहते काळजीत, नेमकं झालं काय?  

Girija Oak: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक. अनेक मराठी मालिका, चित्रपट तसेच रंगभूमीही तिने गाजवली आहे. गिरीजा तिच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतेच पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. वैयक्तिक आयु्ष्यात गिरीजी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  गिरीजाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहतेही चिंतेत असल्याचं दिसून येत आहे. 

दरम्यान, नुकतीच गिरीजाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसत आहे. तसेच या फोटोवरून समजत आहे की, तिच्या उजव्या पायाला लागलं आहे. पायाची हालचाल होऊ नये म्हणून तिच्या पायाला प्लास्टर केलं आहे. सध्या अभिनेत्रीवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं कळतंय. "अलीकडे आयुष्य..., असं कॅप्शन अभिनेत्रीने या पोस्टला दिलं आहे.  गिरीजाने तिचे रुग्णालयातील काही पोस्ट शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. यामध्ये पहिल्या फोटोत ती व्हिलचेअरवर बसलेली असून तिच्या पायाला प्लास्टर केल्याचं दिसत आहे. तसेच अभिनेत्रीने तिच्या पायाच्या एक्सरेचा फोटोदेखील शेअर केला आहे. मात्र, गिरीजाच्या पायाला फ्रॅक्चर कसं झालं याबद्दल तिने खुलासा केला नसला तरी तिला तिच्या चाहत्यांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

वर्कफ्रंट

अलिकडेच गिरीजा 'जवान' या चित्रपटामुळे चर्चेत होती. जवानमध्ये तिने बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर 'व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटामध्येही तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक करण्यातं आलं. 

टॅग्स :गिरिजा ओकसेलिब्रिटीसोशल मीडियाहॉस्पिटल