Join us

केसरिया तेरा...!! जीवनाचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या ऐश्वर्या नारकरचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:53 IST

Aishwarya Narkar: वयाची चाळीशी पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांचा फिटनेस एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा आहे.

वय म्हणजे निव्वळ आकडा हे सांगणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar). वयाची चाळीशी पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांचा फिटनेस एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसची आणि सौंदर्याची कायम चर्चा होत असते. ऐश्वर्या सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय असून त्या कायम त्यांचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यामध्येच आता त्यांनी एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या सुट्टीचा आनंद घेत असून प्रत्येक क्षण आनंदात जगा असा सुंदर मेसेज त्यांनी चाहत्यांना दिला आहे. तसंच या व्हिडीओमध्ये त्याने काही फोटोंचा कोलाजही केला आहे. या व्हिडीओच्या बॅक ग्राऊंटला ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरियाँ हे गाणं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या अगदी कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुलीप्रमाणे उत्साही असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या व्हिडीओला विशेष पसंती मिळत आहे.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीसिनेमा