Join us  

अजिंक्य ननावरे-शिवानी सुर्वेचा झाला साखरपुडा, Photos शेअर करत चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 9:47 PM

साखरपुड्याचे सुंदर फोटो पाहिले का?

मराठी मनोरंजनसृष्टीतील एका रोमँटिक जोडप्याने साखरपुडा केल्याची बातमी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही जोडी आहे अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve). अजिंक्य आणि शिवानी यांच्या रिलेशनशिपविषयी चाहत्यांना कल्पना होतीच. आता एक पाऊल पूढे टाकत दोघांनी साखरपुडा केला आहे. या सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वेने काही दिवसांपूर्वीच साड्यांची खरेदी करतानाचे फोटो शेअर केले होते. त्यावरून तिने लग्नाचीच हिंट दिली होती. आज दोघांनी जवळच्या लोकांच्या साक्षीने साखरपुडा करत नातं पुढच्या टप्प्यावर नेलं आहे. शिवानीने साखरपुड्यासाठी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. यासार अगदी साधा मेकअप केला आहे. यामध्ये शिवानी खूपच सुंदर दिसतेय. तसंच तिने हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. तर अजिंक्यही पांढरा कुर्ता, सलवार आणि जॅकेट मध्ये खूप शोभून दिसत आहे. अंगठी घालताना दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येतोय. अगदी साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला आहे.

 

शिवानी आणि अजिंक्य काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघेही फिरायला जातात गेला तिथले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. दोघांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता हे क्युट कपल येत्या काही दिवसातच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघं नक्की कधी लग्नबंधनात अडकतात याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. मनोरंजनसृष्टी आणि चाहतेही अभिनंदन करत आहेत.

दोघांच्या कामाविषयी बोलायचं तर अजिंक्य सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही सध्याची टीआरपी मधील आघाडीची मालिका आहे. तर शिवानी मराठी सिनेमा गाजवत आहे. 'वाळवी' आणि झिम्मा 2' असे तिचे बॅक टू बॅक 2 मराठी चित्रपट हिट झाले आहेत.

टॅग्स :शिवानी सुर्वेमराठी अभिनेताटिव्ही कलाकारलग्नसोशल मीडियामराठी चित्रपट