Join us

'आमदार झाल्यासारखं वाटतंय …', विकास पाटीलची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 14:55 IST

Vikas patil: विकासनेही ध्वजारोहण करतानाचे काही फोटो शेअर केले. यावेळी त्याने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरलं.

'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi) माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विकास पाटील (vikas patil). हा शो संपल्यानंतर विकासचा सोशल मीडियावरील वावर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट् जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. विकासने अलिकडेच १५ ऑगस्टच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टला त्याने दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत येत आहे.

१५ ऑगस्टचं निमित्त साधत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी स्वातंत्र्य दिन साजरा करणारे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. यात विकास पाटीलही मागे नव्हता. विकासनेही ध्वजारोहण करतानाचे काही फोटो शेअर केले. यावेळी त्याने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरलं.

विकासने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणे भासत आहे. त्यामुळेच या फोटोला त्याने कॅप्शनही तसंच दिलं. 'आमदार झाल्यासारखं वाटतंय …', असं भन्नाट कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. विकासचा हा फोटो बिग बॉस विजेता आणि त्याचा बेस्टफ्रेंड विशाल पाटील याने काढला आहे.

दरम्यान,  विकासने 'अधुरी एक कहानी' या मालिकेतून टीव्ही विश्वात पाऊल टाकले. त्यानंतर 'बायको अशी हवी', 'अंतरपाट', 'कुलवधू', 'माझीया माहेरा', 'लेक माझी लाडकी', ' वर्तुळ ' या मालिकेत त्याने काम केलं. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारस्वातंत्र्य दिन