Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रशस्त हॉल, तुळशी वृंदावन अन्...; साधं पण सुंदर आहे शशांक केतकरचं घर, अभिनेत्याने दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:37 IST

'मुरांबा'मधील शशांकचं घर पाहिलं का? अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

अभिनेता शशांक केतकर 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचला. पहिल्याच मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत त्याने साकारलेलं श्री हे पात्रही प्रचंड हिट झालं होतं. यानंतर शशांक केतकर अनेक मालिकांमध्ये दिसला. शशांकचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. शशांक सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांना त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट देत असतो. 

नुकतंच शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शशांकने त्याच्या घराची झलक दाखवली आहे. घरात एन्ट्री केल्यावरच प्रशस्त हॉल पाहायला मिळत आहे. एका बाजूला सोफा तर दुसऱ्या बाजूला खूर्ची ठेवून बसण्याची व्यवस्था केल्याचं दिसत आहे. अगदी छोट्या छोट्या वस्तूंनी शशांकने त्याचं घर डेकोरेट केल्याचं दिसत आहे. घराच्या बाल्कनीत झाडंही लावल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या सगळ्यात लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे बाल्कनीतील तुळशी वृंदावनने. शशांकच्या घराच्या बाल्कनीत छोटं तुळशी वृंदावन पाहायला मिळत आहे. अगदी साधं पण तितकच सुंदर असं शशांकचं घर आहे. 

सध्या शशांक 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याआधी तो 'पाहिले न मी तुला', 'हे मन बावरे' या मालिकांमध्ये दिसला होता. शशांकने 'शो टाइम', 'स्कॅम २००३', 'गुनाह' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. अभिनयाबरोबरच शशांक त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. अनेकदा तो समाजातील मु्द्द्यांवर त्याचं मत मांडताना दिसतो. 

टॅग्स :शशांक केतकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता