Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरात लक्ष्मी आली! शशांक केतकरला कन्यारत्न, लेकीचं नावही ठेवलंय खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:44 IST

शशांक दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. शशांकला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला आहे. मराठी अभिनेताशशांक केतकरच्या घरीही चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. शशांक दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. शशांकला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. शशांकने लेकीचं बारसंही केलं असून नावही ठेवलं आहे. 

शशांकने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. या व्हिडिओतून त्याने लेकीचं नावही जाहीर केलं आहे. शशांकने त्याच्या लाडक्या लेकीचं नाव राधा असं ठेवलं आहे. त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. "खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं. घरी लक्ष्मी आली", असं शशांक व्हिडिओत म्हणत आहे. 

शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरीही शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने एक फोटो टाकला आहे. यामध्ये "हम दो हमारे दो" असं त्याने म्हटलं आहे. 

शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून शशांकला प्रसिद्धी मिळाली. त्याने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. शशांकने २०१७ साली प्रियांका ढवळेसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना ऋग्वेद हा मुलगा आहे. आता मुलगी झाल्याने शशांक आणि प्रियांका आनंदी आहेत. 

टॅग्स :शशांक केतकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता