Join us  

"बाबासाहेबांच्या मिरवणुकीत माझ्या मालिकेचं गाणं वाजलं अन्...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:47 AM

"भीमराया...", आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत वाजलं मराठी मालिकेचं गाणं, अभिनेता म्हणतो...

दरवर्षी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. यावर्षीही  मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांना वंदन करून ठिकठिकाणी मिरवणुकाही काढल्या गेल्या. अशाच एका मिरवणुकीचा व्हिडिओ मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरने शेअर केला आहे. संकेतने त्याच्या सोशल मीडियावरुन आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीचा व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 

संकेतच्या घराबाहेर आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत संकेतने काम केलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची यशोगाथा' मालिकेचं गाणं वाजवण्यात आलं. याचा व्हिडिओ शेअर करत संकेत म्हणतो, "आज बाबासाहेबांची जयंती...मी बाहेर शूट करतोय आणि उमाने घराच्या खिडकीतून काढलेला हा व्हिडीओ मला पाठवला. माझ्या घरासमोर मिरवणूक जात असताना माझ्याच मालिकेचे गाणे वाजवले आणि हे पाहून मन भरुन आलं. खूप छान वाटलं. ह्या भूमिकेचा आणि प्रेक्षकांचा आजन्म ऋणी. जय भीम". 

संकेतने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची यशोगाथा' या मालिकेत बाबासाहेबांची तरुणपणीची भूमिका साकारली होती. या मालिकेत सागर देशमुख आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे मुख्य भूमिकेत होते. सागर देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर शिवानीने बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :मराठी अभिनेताडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती