Ritiesh Deshmukh Coldplay Concert Video: लोकप्रिय ब्रिटीश बॅंड 'कोल्डप्ले' चा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळतो आहे. सध्या या म्यूझिक बॅंडचा भारतात दौरा आहे. अगदी अलिकडेच नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडिएअममध्ये कोल्डप्ले चा मोठा कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमध्ये अनेक बड्या लोकांनाही हजेरी लावली. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रेटी मंडळींनी देखील या कॉन्सर्टमध्ये उपस्थिती दाखवली. दरम्यान, या कॉन्सर्टला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी सहकुटुंब हजेरी लावली.
सोशल मीडियावर जिनिलिया देशमुखने कोल्डप्ले च्या कॉन्सर्ट दरम्यानचे काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद करून त्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत रितेश-जिनिलिया कॉन्सर्टमध्ये धमाल करताना दिसत आहेत. भव्य लेझर लाईट शो आणि सुरांची मैफिल रंगल्याची पाहायला मिळतेय. रितेश जिनिलियाच्या मुलांनी देखील या कॉन्सर्टचा आनंद घेतला.शिवाय अभिनेत्याचे सासरेबुवा सुद्धा उपस्थित होते.
जिनिलिया देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या शोचा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, "कोल्डप्ले! काय सुंदर शो होता. शिवाय या शोसाठी निवडलेलं ठिकाण सुद्धा परफेक्ट होतं. साधारणत: २०१६ मध्ये मी आणि रितेश आम्ही दोघे पहिल्यांदा या शोमध्ये आलो होतो. त्यानंतर आता २०२५ मध्ये पुन्हा आवर्जून आम्ही या कॉन्सर्टला उपस्थित राहिलो. आता 'कोल्डप्ले बँड' पुन्हा भारतात खास करुन मुंबईत येण्याची आम्ही वाट पाहत आहोत."
कोल्डप्लेची सध्या म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर सुरू आहे. १८ आणि १९ तारखेनंतर या बँडने २१ जानेवारीला देखील नवी मुंबईतच सादरीकरण केलं.शिवाय आपल्या गायनाने मुंबईकरांची मनं जिंकली.