Join us
Daily Top 2Weekly Top 5

हनिमून नंतर आधी 'या' ठिकाणी पोहोचला दगडू, बायकोसोबत जुन्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 18:03 IST

प्रथमेश आणि क्षितीजा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.

टाईमपास फेम प्रथमेश परब (Prathamesh Parab) नुकताच लग्नबंधनात अडकला. क्षितीजा घोसाळकरसोबत २४ फेब्रुवारी रोजी त्याने आयुष्यभराची गाठ बांधली. तर १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला त्यांनी साखरपुडा केला. लग्नानंतर प्रथमेश बायकोसोबत कुठे फिरायला गेला असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला असेलच. प्रथमेशने मात्र भन्नाटच जागा शोधून काढली आहे.  हनिमूनला नंतर जाऊ पण आधी त्याने एका जागेला अवश्य भेट दिली आहे.

प्रथमेश आणि क्षितीजा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचं लाँग ड्राईव्ह, बाईक राईडवर जायचं ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळामध्ये सूर्यास्त बघायचा , वाढदिवस साजरे करायचे, कांदाभजी, मिसळ पावचा आस्वाद घ्यायचा आणि छान वेळ घालवायचा अशा अनेक आठवणी प्रथमेश आणि क्षितीजाच्या आहेत. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी दोघंही लोणावळा मध्येच लग्नानंतर आले आहेत. लोणावळा डॅमच्या येथील फोटो शेअर करत प्रथमेश लिहितो, "दोघांच्याही व्यस्त शेड्युलमुळे २-३ महिन्यांनंतर कुठेतरी फिरायला जाऊया असं ठरलं. पण त्याआधी आवर्जुन एका ठिकाणाला भेट द्यावीशी वाटली. लोणावळ्याच्या एक ना अनेक आठवणी आहेत. आज त्या सगळ्यांना भेटायला आलो आहोत."

इन्टाग्रामवर दोघांची पहिली ओळख झाली. एका फोटोशूटवर प्रथमेशने कमेंट करुन तिला मेसेज केलेला. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी वाढत गेली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रथमेश आणि क्षितीजा अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. 

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेतालग्न