Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आप्पाचा विषय लय हार्ड ए", ट्रेंडिंग गाण्यावर कुशल बद्रिकेचा भन्नाट रील, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 12:41 IST

"आप्पाचा विषय लय हार्ड ए" हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. या गाण्यावर कुशलने रील बनवला आहे.

कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनय आणि विनोदीशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कुशलने अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर स्वत:ची ओळख बनवली. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. त्याबरोबरच अनेक मजेशीर व्हिडिओही तो शेअर करत असतो. 

नुकतंच कुशलने ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "आप्पाचा विषय लय हार्ड ए" हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. "आप्पाचा विषय लय हार्ड ए...आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड ए...आप्पाचं घरात नाही ध्यान ए...आप्पाचा बाहेर लय लाड ए", असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर कुशलने मजेशीर रील व्हिडिओ बनवला आहे.  कुशलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 

कुशलने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. चला हवा येऊ द्या या शोने कुशलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. मॅडनेस मचाऐंगे या हिंदी कॉमेडी शोमध्येही तो दिसला होता. या शोमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. जत्रा, पांडू, डावपेच, भिरकीट, रंपाट, बापमाणूस, बकुळा नामदेव घोटाळे, माझा नवरा तुझी बायको यांसारख्या सिनेमात त्याने काम केलं आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता