Join us

प्रेक्षकांची 'आतुर'ता संपणार; चिन्मय उदगीरकरच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:55 IST

AATUR: या सिनेमात चिन्मयसह योगेश सोमणदेखील झळकणार आहेत.

'धग', 'भोंगा' अशा गाजलेल्या सिनेमांचं नाव घेतलं तर डोळ्यासमोर येणारं पहिलं नाव म्हणजे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तम कथानक असलेले सिनेमा सिनेसृष्टीला दिले. त्यामुळे त्यांच्या सिनेमाची प्रेक्षक कायमच आतुरतेने वाटत पाहत असतात. यामध्येच त्यांचा आतुर हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.

बुधवारी (११ ऑक्टोबर) आतुर या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. त्यामुळे आता या सिनेमाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक जण या सिनेमाविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.पोस्टरमध्ये चित्रपटातला एक प्रसंग दिसत असून त्यात प्रीती मल्लापुरकर पाठमोऱ्या उभ्या असून मागे योगेश सोमण जमिनीवर बसले आहेत. ते घराच्या एका खोलीत असून तिथे बरीच काढलेली चित्रं भिंतीवर किंवा स्टँडवर लावलेली आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या व्यक्तिरेखांविषयीही अंदाज लावले जात आहेत.

आतुर या आगामी सिनेमात अभिनेत्री प्रिती मल्लापुरकर ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत योगेश सोमण, चिन्मय उदगीरकर, प्रणव रावराणे ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत. झेनिथ प्रोडक्शनच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी तर कथा-पटकथा तेजस  परसपाटकी, आनंद निकम व किरण जाधव यांनी लिहिली आहे. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीचिन्मय उद्गगिरकरयोगेश सोमण