Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवेदिता,रंजना नाही तर 'ही' होती अशोक मामांची जवळची मैत्रीण; तुम्हाला माहितीये का तिचं नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 11:40 IST

Ashok saraf : अशोक सराफ यांची मैत्रीणदेखील उत्तम अभिनेत्री असून तिने 'घरकुल' या सिनेमात काम केलं आहे.

एकवेळ प्रेक्षकांना रडवणं सोपं असतं पण, त्यांना खळखळून हसायला लावणं तितकंच कठीण. हे कठीण काम अगदी सहजपणे पूर्ण करणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ. मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून अशोक सराफ (ashok saraf) यांच्याकडे पाहिलं जातं. कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.  सध्या अशोक मामांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. परंतु, त्यांच्याविषयीचे अनेक किस्से नेटकऱ्यांमध्ये दररोज रंगतात. सध्या त्यांच्या एका इंडस्ट्रीतील मैत्रिणीविषयी चर्चा रंगली आहे. लोकमत फिल्मीने अशोक सराफ यांच्या ६ Unknown Facts चा व्हिडीओ अलिकडेच शेअर केला आहे.

साधारणपणे रंजना देशमुख (ranjana deshmukh) किंवा निवेदिता सराफ (nevidita saraf) या अशोक सराफ यांच्या जवळच्या मैत्रिणी असतील असं अनेकांना वाटतं. मात्र, प्रत्यक्षात तसं अजिबात नाही. निवेदिता सराफ त्यांच्या पत्नी आहेत. तर, रंजना त्यांची मैत्रीण होती. परंतु, या दोघींपेक्षाही अशी एक व्यक्ती होती जी अशोक सराफ यांची फार चांगली आणि अत्यंत जवळची मैत्रीण होती.

अशोक सराफ यांच्या जवळच्या मैत्रिणीचं नाव तारका ठेंगडी असं होतं. तारका ठेंगडी यांनी घरकूल या गाजलेल्या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत जयश्री गडकर, अरुण सरनाईक हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. 

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफमराठी अभिनेतासिनेमा