Join us

Adinath Kothare : बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?; लेकीच्या प्रश्नाला आदिनाथ कोठारेचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 09:58 IST

Adinath Kothare : आदिनाथ सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असतो. त्याच्या विविध अंदाजातील फोटो, व्हिडीओ तो चाहत्यांसाठी शेअर करत असतो. परंतु त्याचे जिजासोबतचे व्हिडीओ आणि फोटो सर्वाधिक लोकप्रिय होतात.

अभिनेता अदिनाथ कोठारे आणि त्याची मुलगी जिजा यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. ती आपल्या डॅडासोबत इव्हेंट्सला देखील हजर असते. आदिनाथ सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असतो. त्याच्या विविध अंदाजातील फोटो, व्हिडीओ तो चाहत्यांसाठी शेअर करत असतो. परंतु त्याचे जिजासोबतचे व्हिडीओ आणि फोटो सर्वाधिक लोकप्रिय होतात. ती नेहमीच त्याला प्रश्न विचारत असते आणि तो देखील तिला उत्तर देत असतो.

जिजाने तिच्या डॅडाला एक मजेशीर प्रश्न विचारला आणि आदिनाथने देखील तिच्या प्रश्नाला भन्नाट उत्तर दिलं. "डॅडा, बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?" असा प्रश्न जीजाने विचारला आहे. यावर आदिनाथने "अगं काही नाही. दोन्ही सेम असतात..." असं म्हटलं आहे. आदिनाथने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे.  "बरीच लोकं मला विचारत असतात. “अरे तू ते #जीज़ाआणिडॅडा का लिहीत नाहीस हल्ली?” तर त्याचं उत्तर असं आहे की हल्ली माझ्या मुलीच्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरच नसतात. असो. मला वाटतं तेही तुम्हाला आवडेल वाचायला. तर मग असा एक प्रयत्न करून बघूया. काय वाटतं? #जीज़ाआणिडॅडा season2" असं म्हणत आदिनाथने लाडक्या लेकीसोबत नेमकं काय संभाषण झालं ते सांगितलं आहे. 

जीजा ही उर्मिला आणि आदिनाथ यांची मुलगी आहे. ती मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय स्टार किड आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज आहे.  पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाल्यानंतर आदिनाथने उर्मिलाला मुंबईत प्रपोज केलं. दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी लग्न केलं.

आदिनाथ कोठारे हा एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे, ज्याने प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम केलं आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पाणी' या मराठी चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्याचे वडील महेश कोठारे हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. आदिनाथने '८३' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

टॅग्स :आदिनाथ कोठारेउर्मिला कानेटकर कोठारे