Join us

‘चॉकलेट बॉय’ अभिनय बेर्डेवरच्या सिनेमातलं ‘एक नंबर बाप्पा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाला-‘बाप्पाचं आगमन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:50 IST

सध्या सगळ्यांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेत. अभिनेता अभिनय बेर्डे सुद्धा त्याला अपवाद नाही.

सध्या सगळ्यांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेत. अभिनेता अभिनय बेर्डे सुद्धा त्याला अपवाद नाही. मी देखील बाप्पाचा ‘नंबर वन फॅन’ असल्याचं सांगत बाप्पाच्या स्वागताच्या जल्लोषात तो सहभागी झाला आहे. ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं मराठीतला ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता अभिनय बेर्डे, हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि ‘बिग बॉस १५’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही फ्रेश जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

ताल धरायला लावणाऱ्या या गाण्यावर अभिनयचा जबरदस्त परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. प्रत्येकाला थिरकायला लावेल अशा या गाण्याचे बोल आणि त्याचे संगीत या दोन्ही बाजू शोर यांनी सांभाळल्या आहेत. देव नेगी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. 

या गाण्याबद्दल बोलताना अभिनय सांगतो की, ‘बाप्पाचं आगमन’ सगळयांनाच आनंद देणार असतं. हाच आनंद आणि उत्साह तुम्हाला या गाण्यात पहायला मिळेल. मला स्वत:ला गणपतीच हे गाणं करताना खूप मजा आली. ‘बाप्पा’ हा सर्वांसाठीच नंबर वन’ असतो. यंदाच्या गणपतीत हे गाणं कल्ला करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.

टॅग्स :अभिनय बेर्डेसेलिब्रिटी