Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:40 IST

काही दिवासंपूर्वीच अभिजीतने ठाण्यातील घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पोस्ट शेअर करत त्याच्यावर बेतलेला जीवघेणा प्रसंग सांगितला होता. आता पुन्हा अभिजीतला वाहतुक कोडींची सामना करावा लागला आहे. वैतागलेल्या अभिजीतने पुन्हा पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. 

अभिजीत केळकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. समाजातील विविध मुद्द्यांवर तो अगदी परखडपणे भाष्य करताना दिसतो.अभिजीत नेहमीच निर्भिडपणे त्याचं मत मांडताना दिसतो. काही दिवासंपूर्वीच अभिजीतने ठाण्यातील घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पोस्ट शेअर करत त्याच्यावर बेतलेला जीवघेणा प्रसंग सांगितला होता. आता पुन्हा अभिजीतला घोडबंदरवरील वाहतुक कोडींची सामना करावा लागला आहे. वैतागलेल्या अभिजीतने पुन्हा पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. 

अभिजीतने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन आज घडलेला प्रसंग सांगत ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने संताप व्यक्त केला आहे. "आज शूटिंगचा साडेआठचा कॉल टाईम होता. साडेसात वाजता घरून गुगल मॅप बघून निघालेला मी गेल्या दीड तास घोडबंदर रोडवरच्या घाटाच्याही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंपच्या इकडे बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे. ट्राफिक कधी सुटणार? शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार हे माहीत नाही. ह्या केऑटिक सिच्युएशनमध्ये घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक ड्रायव्हर्समुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्या खाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या स्पॉटला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार  झालाच तर माझा उल्लेख, "अभिनेता" अभिजीत केळकर असा न करता "चांद्र मोहीमवीर" अभिजीत केळकर असा करावा ही विनंती... ", असं अभिजीतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट करत त्यांचे अनुभव सांगितले आहेत. 

अभिजीतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मराठीमध्येही तो सहभागी झाला होता. सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :अभिजीत केळकरमराठी अभिनेताटिव्ही कलाकारठाणे