Join us

“पहिलेच मुख्यमंत्री...”, एकनाथ शिंदेंचा केईम रुग्णालयातील व्हिडिओ शेअर करत मराठी अभिनेत्याची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 17:39 IST

मराठी अभिनेत्याला मुख्यमंत्र्यांचं कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाला...

अनेक मालिका आणि चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. समाजातील घडामोडींवर अभिजीत परखडपणे त्याचं मत व्यक्त करताना दिसतो. अभिजीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी(२१ ऑगस्ट) परळ येथील केईम रुग्णालयात अचानक दाखल होत तेथील रुग्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कामकाजाचाही आढावा घेतला. केईम रुग्णालयातील एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता. अभिजीत केळकरने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. “इतक्या ग्राऊंड लेव्हलला जाऊन काम करणारे पहिलेच मुख्यमंत्री”, असं त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवणं महागात पडलं, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल

“ते मला भिकारी समजले आणि...”, ‘ताली’ फेम मराठी अभिनेत्रीने शेअर केला शूटिंगदरम्यानचा ‘तो’ प्रसंग

सध्या अभिजीत ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तो बालगंधर्वांच्या भूमिकेत आहे. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेमुळे अभिजीत घराघरात पोहोचला. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातही अभिजीत सहभागी झाला होता.

टॅग्स :एकनाथ शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपटटिव्ही कलाकारबिग बॉस मराठी