Join us

'बिग बॉस' च्या नावाखाली फसवणूक, रात्री ३ वाजता... मनिषा राणीने सांगितला धक्कादायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 20:30 IST

कास्टिंग काऊचचा शिकार होता होता वाचली. काय आहे तो किस्सा?

'झलक दिखला जा 11'ची विजेती आणि 'बिग बॉस ओटीटी' 2 फेम मनिषा राणी (Manisha Rani)  अतिशय गरिबीतून वर आली आहे. बिहारच्या मनिषाने आयुष्यात खूप स्ट्रगल केला. पण आज ती उत्तम डान्सर म्हणून नावारुपाला आली आहे. नुकतंच तिने एक धक्कादायक प्रसंग सांगितला. 'बिग बॉस' च्या नावाखाली तिची मोठी फसवणूक झाली होती. कास्टिंग काऊचचा शिकार होता होता वाचली. काय आहे तो किस्सा?

मनिषा राणीने नुकतंच Galatta India ला मुलाखत दिली. यावेळी तिने संघर्षाच्या दिवसाच्या आठवणी ताज्या केल्या. मनिषा म्हणाली, "एकदा मी एका व्यक्तीला भेटले होते. तो बिग बॉस टीममधला आहे असं त्याने मला सांगितलं. मी त्याचा नंबर घेतला. माझे काही डान्स व्हिडिओ शेअर केले. त्याने मला बरीच मोठी स्वप्नं दाखवली की तो मला बिगू बॉसमध्ये जाण्याची संधी देईल."

ती पुढे म्हणाली, "मी 4-5 दिवसांसाठी पुन्हा बिहारला माझ्या घरी गेले होते. तेव्हाच त्याने मला फोन केला आणि म्हणाला तुला कलर्समध्ये जायचं नाही का? बिग बॉसमध्ये जायची इच्छा नाही का? घरी जाऊन काय बसली, लगेच मुंबईत ये. मी सुद्धा हे ऐकून लगेच तिकीट काढून मुंबईला आले. तो मला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवायचा. एकदा त्याने मला रात्री ३ वाजता घरी येण्यास सांगितलं. मी थेट नकार दिला. यानतंर तो माझ्यावर खूप भडकला. मी खूप रडले कारण माझी मोठी फसवणूक झाली होती."

मनिषा राणी टिकटॉकमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. तिने भोजपुरी टीव्ही आणि सिनेइंडस्ट्रीत काम केलं. नंतर तिला बिग बॉस ओटीटी 2 मध्ये पाहिलं गेलं. मनिषा उत्तम डान्स करते याची झलक 'झलक दिखला जा' शोमध्ये मिळाली.

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉसकास्टिंग काऊचसेलिब्रिटीनृत्य