Join us

लोकं तिला नावं ठेवतात पण..., मनीषा कोईरालाला कंगना राणौतचा पुळका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 15:58 IST

एक काळ गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला ( Manisha Koirala ) सध्या बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही.

एक काळ गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला ( Manisha Koirala ) सध्या बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. सध्या तिच्या एका मुलाखतीची जोरदार चर्चा आहे. मनीषाने कंगना राणौतचं  (Kangana Ranaut) भरभरून कौतुक केलं आहे. कंगना एक बुद्धिमान अभिनेत्री आहे, असे तिने म्हटलंय. आता मनीषाला कंगनाचा इतका पुळका का यावा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर मनीषा म्हणे, कंगनाच्या प्रेमात आहे. होय, लोक कंगनाबद्दल काहीही बोलोत पण मनीषा कंगनाची मोठी फॅन आहे.एका मुलाखतीत मनीषा बॉलिवूडमधील नव्या पिढीबद्दल बोलली. बॉलिवूडमधील सध्याच्या आवडत्या कलाकारांबद्दल तिने सांगितलं. 

बॉलिवूडमध्ये अनेक प्रतिभावान तरूण कलाकार आहे. ही पिढी अतिशय बुद्धिमान व हुशार आहे. आपण काय करतोय, कुठल्या इंडिस्ट्रीत आहोत, याचं नेमकं भान त्यांना आहे, असं मनीषा म्हणाली. रणबीर कपूर व कार्तिक आर्यन हे दोघे मला खूप आवडतात. आलिया भटही मला खूप आवडते.  माझ्यापेक्षाही ती कितीतरी उत्तम काम करते, असे मनीषा म्हणाली आणि मग ती कंगनावर आली.

सध्याच्या घडीला कंगना ही एक प्रभावी अभिनेत्री आहे. मी तिचा क्वीन ज्यावेळी पाहिला तेव्हा तिच्या प्रेमातच पडले होते.  लोकं कंगनाबाबत काहीही बोलतात पण मला विचाराल तर ती एक बुद्धीमान अभिनेत्री आहे. तिला अभिनयाची चांगली जाण आहे. त्यामुळे तिला नावं ठेवणं काही योग्य होणार नाही. या घडीला बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून तिचं नाव घेता येईल.  त्यामुळे जे कोणी तिला नावं ठेवतात त्यांनी तिच्याबद्दल आपलं मत बदलण्याची गरज आहे, अशा शब्दांत मनीषाने कंगनाचं कौतुक केलं.

टॅग्स :मनिषा कोईरालाकंगना राणौत