Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:56 IST

हीरामंडी सीझन २ कधी येणार?

अभिनेत्री मनीषा कोईराला (Manisha Koirala) ९० च्या दशकात आघाडीवर होती. 'दिल से','बॉम्बे','मन' असे एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. नंतर वैयक्तिक आयुष्यातील काही कारणांमुळे स्क्रीवरुन दूर गेली. तसंच तिने मधल्या काळात कॅन्सरवरही मात केली. काही महिन्यांपूर्वी आलेल्या संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमधून तिने जबरदस्त कमबॅक केले. आता नुकतंच मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' वर भाष्य केले आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत मनीषा कोईराला म्हणाली, "हीरामंडी २ हा माझ्यासाठी लाईफटाईम प्रोजेक्ट आहे. सीक्वेलचं काम कधी सुरु होईल मला कल्पना नाही. सध्या संजय भन्साळी लव्ह अँड वॉर सिनेमात व्यस्त आहेत. यानंतरच ते हीरामंडी २ वर काम सुरु करतील. मी सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी खूप उत्सुक आहे."

ती पुढे म्हणाली, "कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर मी आयुष्याचा आनंद घेत आहे. काम करायची आणि अधिक चांगल्या भूमिका करण्याची संधी मला मिळत आहे. चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करता येत आहे. त्यामुळे आता अभिनयात मला आणखी कसा विस्तार करता येईल याचा मी विचार करत आहे. मला आव्हानांचा सामना करायचा आहे. साईड रोल करण्याची माझी इच्छा नाही."

या मुलाखतीत मनिषाने अनेक खुलासे केले आहेत. शाहरुख खानसोबत 'दिल से' सिनेमात तिने काम केलं होतं. यामध्ये शाहरुख मरतो असं दाखवण्यात येणार नव्हतं पण नंतर शेवट बदलण्यात आला. तर बॉम्बेमध्ये काम करण्यासाठी आधी मनिषाने नकार दिला होता. पण मनाचं ऐकून तिने मणिरत्नम यांना होकार दिला. बॉम्बे सुपरहिट झाला आणि तिचा हा निर्णय अगदी योग्य असल्याचं सिद्ध झालं. 

टॅग्स :मनिषा कोईरालावेबसीरिजबॉलिवूड