छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस १३'मधून लोकप्रिय झालेला असीम रियाज, एक उत्कृष्ट अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने शोमध्ये फर्स्ट रनर अपचे स्थान मिळवून मनोरंजन उद्योगात स्वतःचे वेगळे स्थान बनवले आहे. इथेपर्यंत पोहचवण्याचे श्रेय तो संगीता भाटिया यांना देतो. त्या तोएब मॅनेजमेंट कंपनीच्या फाउंडर आहेत.
संगीताचे आभार मानण्यासाठी असीमने बिग बॉसमध्ये जिंकलेले 'सुलतानी आखाडा मेडल' संगीताला भेट म्हणून दिले.
नवीन चेहऱ्यांपासून प्रस्थापित चेहऱ्यापर्यंत मॉडेलिंग आणि मनोरंजनाच्या जगतामध्ये तोएबने काही उत्कृष्ट व्यक्तिमत्व सिनेइंडस्ट्रीला दिले आहेत.