Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रात्री दारूच्या नशेत तो माझ्या खोलीजवळ अन्...", प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत १७ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:57 IST

"रात्री दारुच्या नशेत तो माझ्या खोलीजवळ अन्...", प्रसिद्ध अभिनेत्रीने हाणून पाडला दिग्दर्शकाचा 'तो' प्लॅन, असं काय घडलेलं?

South Actress Suma Jayaram : टीव्ही इंडस्ट्री असो किंवा मोठा पडद्या अनेकवेळा कलाकारांना या प्रवासात चांगले वाईट अनुभव येत असतात. विशेषत:  सगळ्यात जास्त महिला कलाकारांना अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचदा अभिनेत्रींनी त्यांना इंडस्ट्रीत आलेल्या धक्कादायक अनुभवांबद्दल खुलासा केला आहे. त्यात आता एका मुलाखतीत दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेत्री सुमा जयराम यांनी त्यांना आलेला त्या वाईट अनुभवांविषयी वक्तव्य केलं आहे. 

मामूटी आणि मोहनलाल सारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलेल्या सुमा जयराम हे नाव इंडस्ट्रीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अलिकडेच, अभिनेत्रीने इंडस्ट्रीमधील वाईट गोष्टींवर प्रकाश टाकत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.  एका दिग्दर्शकाकडून अभिनेत्रीला वाईट अनुभव आला होता. मात्र, तिने त्याचा तो डाव हाणून पाडला. अभिनेत्री सुमा जयराम माइलस्टोन मेकर्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या,"त्यावेळी इंडस्ट्री आजसारखी नव्हती. हल्लीच्या काळात मी टू सारख्या चळवळी उभारल्या गेल्या आहेत आणि इंडस्ट्री पूर्णपणे बदलली आहे. त्यावेळी इंडस्ट्री फारच वेगळी होती. जर तुम्ही तडजोड केली नाहीतर अनेक महत्त्वाची कामं तुमच्या हातून जात असत. तेव्हा कोणी काहीच बोलत नसे कारण प्रत्येकाच्या डोक्यात कुटुंबाचा विचार असायचा. आजही जो कोणी बोलतो त्याला काम न मिळण्याची भीती असते."

रात्री १० वाजता दिग्दर्शकाने दरवाजा ठोठावला अन्...

त्यानंतर अभिनेत्री तिच्यासोबत घडलेल्या एका वाईट घटनेबद्दल बोलताना म्हणाली, "एकदा इंडस्ट्रीतील नावाजलेल्या दिग्दर्शकाच्या चित्रपटासाठी शूटिंग करत होते. त्यावेळी माझी आई माझ्याबरोबर होती. ते  शूट साधारण एका आठवडा चालणार होतं. त्यावेळी माझं सकाळचं शूट संपवून मी माझ्या खोलीत गेलो. पण रात्री १० वाजण्याच्या सुमारास, कोणीतरी माझ्या खोलीचा दरवाजा जोरात ठोठावत होतं. मी बाहेर येऊन बघते तर काय दिग्दर्शक दारूच्या नशेत माझ्या खोलीबाहेर उभा होता.पण, मी दार उघडलं नाही आणि तो निघून गेला. त्यावेळी मी १६-१७ वर्षांची होते आमि मी इतकी घाबरले होते की त्याबद्दल कोणाला काहीच सांगू शकत नव्हते. नंतर दुसऱ्या दिवशी तो दिग्दर्शक सेटवर मला घाण शिव्या देत होता. या घटनेबद्दल मी कोणालाच काही सांगितलं नाही."असा धक्कादायक अनुभव अभिनेत्रीने शेअर केला. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी