Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीची 'अप्सरा' दाक्षिणात्य सिनेमात, 'मलाइकोकटाई वालीबन' चा टीझर एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 13:54 IST

सोनाली आता थेट दाक्षिणात्य सिनेमात झळकणार आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.  सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनालीने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.  एक पाऊल पुढे टाकत सोनाली आता थेट दाक्षिणात्य सिनेमात झळकणार आहे. सोनालीने सोशल मीडियावर तिच्या दाक्षिणात्य सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. 

सोनाली कुलकर्णी ही लवकरच एका मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. ‘मलाइकोकटाई वालीबन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत झळकणार आहे. 25 जानेवरी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  ‘मलाइकोकटाई वालीबन’ हा चित्रपट मल्याळमसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 130 दिवस राजस्थान, चेन्नई आणि पुद्दुचेरीसह अनेक ठिकाणी झाले आहे. 

‘मलाइकोकटाई वालीबन’ टीझरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक लिजो जोस पेल्लीसरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  सोनालीची ही पोस्ट पाहून चाहते तसेच तिचे सहकलाकार अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सोनाली कुलकर्णीला आता दाक्षिणात्य सिनेमात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सोनालीने अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना मराठी इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठला आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठी अभिनेताTollywoodसेलिब्रिटी