Join us

ब्लॅक कलरचा ट्रान्सपरन्ट ड्रेस घालून पार्टीत पोहोचली मलायका अरोरा, सोशल मीडियावर धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:08 IST

Malaika Arora : मलायकाने लूक पूर्ण करण्यासाठी सटल मेकअप, हाय हिल्स आणि टाइट पोनी केली होती. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती.

बोल्डनेस आणि स्टाइलबाबत मलायका अरोराचं (Malaika Arora) नाव सर्वातआधी घेतलं जातं. मलायका आजकाल असे ड्रेसेस घालून घराबाहेर पडते की, त्या ड्रेसची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागते. नुकतीच मलायका निर्माता रितेश सिधवानीने फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरसाठी आयोजित पार्टीत पोहोचली होती. यावेळी तिचा लूक फारच ग्लॅमरस होता. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

मलायका अरोरा जशी या पार्टीमध्ये पोहोचली सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. मलायका पार्टीत ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर मोनोकनीमध्ये दिसली आणि त्यावर तिने एक ट्रान्सपरन्ट गाउन घातला होता. यातून मलायकाचे टोन्ड लेग्स दिसत होते.

मलायकाने लूक पूर्ण करण्यासाठी सटल मेकअप, हाय हिल्स आणि टाइट पोनी केली होती. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. मलायकाचा हा लूक जसा कॅमेरा कैद झाला त्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मलायकाने पार्टीला येताच कॅमेरासमोर एकापेक्षा एक किलर पोज दिल्या. मलायका या पार्टीमध्ये एकटी नाही तर तिच्या गर्लगॅंगसोबत पोहोचली होती. खास बाब म्हणजे मलायकाच्या गर्लगॅंगने ब्लॅक कलरचे ड्रेस घातले होते. ज्यात करिना कपूर, करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा यांचा समावेश होता.

फरहान अख्तर आणि शिबानी बऱ्याच वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी शबाना आझमी यांच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर १९ फेब्रुवारीला लग्न केलं. त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. 

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूड