Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षातील पहिल्या दिवशी बोल्ड झाली Malaika Arora, शेअर केला बेडरूम व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 13:26 IST

Malaika Arora : एका दिवसाआधीच मलायकाने बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोचीही चांगलीच चर्चा झाली. याच्या कॅप्शनला तिने लिहिलं होतं की, 'मी तुला फार मिस करत आहे मिस्टर पाउटी'.

बॉलिवूडची सुपर बोल्ड अभिनेत्री  मलायका अरोरा (Malaika Arora) ला यावेळी बॉयफ्रेन्ड अर्जुन  कपूरशिवाय नवीन वर्ष साजरं करावं लागलं. अर्जुन कपूरला नुकतीच कोरोनाची लागण झाली. ज्यामुळे त्याने स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. त्यामुळे मलायला नव्या वर्षानिमित्त भेटू शकली नाही. अशात मलायकाने एक बेडरूम व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

मलायका अरोरा बेडवर झोपून दिसत आहे. तिने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे. सोबतच तिने कॅप्शन लिहिलं आहे, 'गुड मॉर्निंग २०२२'. 

एका दिवसाआधीच मलायकाने बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोचीही चांगलीच चर्चा झाली. याच्या कॅप्शनला तिने लिहिलं होतं की, 'मी तुला फार मिस करत आहे मिस्टर पाउटी'. यासोबतच तिने हार्ट इमोजीही शेअर केला होता. फोटोत मलायका आणि अर्जुन पाउट करताना दिसत आहेत. हा त्यांचा मालदीवचा फोटो आहे. काही दिवसांपूर्वीच दोघेही तिथे व्हेकेशनला गेले होते.

काही दिववसांपूर्वीच अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्याच्यासोबतच अंशुला, रिया कपूर आणि तिचा पती करण बूलानी देखील कोरोना संक्रमित झाले आहेत. सध्या हे सगळेजण क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. अर्जुन कपूरची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर मलायका अरोराची सुद्धा कोविड टेस्ट करण्यात आली होती. पण तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसोशल मीडिया