Join us
Daily Top 2Weekly Top 5

Malaika Arora: मलायका अन् अर्जुन कपूरचे ब्रेकअप झाले? न्यू ईयर फोटोत वेगवेगळे दिसले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 12:14 IST

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र अद्याप याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

मलायका अरोरासाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत तिने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत केले आहे. मात्र, फोटोत दोघेही वेगवेगळे उभे असल्याचे दिसत आहेत. ही गोष्ट विचित्र नसली तरी त्यांच्या फॅन्सना मात्र खटकली आहे. काहींनी तर ब्रेकअप झाला का असा सवालही केला आहे. 

वरुण धवन, नताशा दलाल, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा या कपलनी काही मित्र मैत्रिणींसोबत न्यू ईयर पार्टी सेलिब्रेट केली. ते कुठे गेले होते, हे त्यांनी सांगितलेले नाही. परंतू, कोणत्यातरी खासगी लोकेशनवर हे लोक गेले होते. 

हे सर्व लोक ब्लॅक कोटमध्येच दिसत आहेत. वरुण धवनने जंगल सफारीतील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे ते कुठेतरी नॅशनल पार्कमध्ये गेले असतील असा अंदाज बांधला जात आहे. फोटोमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर व्यतिरिक्त कुणाल रावल, अर्पिता मेहता, मोहित मारवा आणि अंतरा मोतीवाला मारवा दिसत आहेत. 

सेलिब्रेशनचा फोटो मलायकाने शेअर केला. परंतू त्यांच्या फॅन्सना वेगळीच शंका आली. चाहत्यांच्या लक्षात आले की अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा फोटोत वेगळे उभे आहेत. एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले - दोघे वेगळे का आहेत? आणखी एका चाहत्याने कमेंट केली - दोघांचे ब्रेकअप झाले का? या कमेंट वाचून नसते काहीतरी पुन्हा चर्चेत यायला नको म्हणून मलायकाला लगेचच आणखी एक फोटो पोस्ट करावा लागला. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र अद्याप याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर