Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राच्या गाण्यावर मलायका अरोराचा BOLD डान्स, व्हिडीओ झालाय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 12:06 IST

सध्या तिच्या एका डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या डान्समुळे ती चर्चेत आलीय. या व्हिडीओत तिने  प्रियांका चोप्राच्या 'राम चाहे लीला' या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. 

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या वेगळ्या अंदाजाने आणि स्टाइलने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. मलायका अरोरालाबॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत. सध्या तिच्या एका डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या डान्समुळे ती चर्चेत आलीय. या व्हिडीओत तिने  प्रियांका चोप्राच्या 'राम चाहे लीला' या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. 

मलायका अरोराच्या या प्रियांका चोप्राच्या गाण्यावरील डान्सचं तिचे फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत. मलायकाचा हा व्हिडीओ इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवरील आहे. या शोमध्ये ती स्पर्धकांसोबत या गाण्यावर थिरकताना बघायला मिळाली. मलायकाच्या या डान्स व्हिडीओमध्ये आकर्षक डान्स स्टेप्सससोबतच तिचे बोल्ड एक्सप्रेशनही बघायला मिळाले आहेत. तसेच तिचा ब्लॅक ड्रेसमधील लूकही अफलातून दिसतोय. 

दरम्यान, मलायका अरोरा नुकतीच कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. याची माहिती तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली होती. तिने सांगितले होते की, ती डॉक्टरांच्या निर्देशांनुसार घरीच क्वारंटाइन झाली आहे. सर्व निर्देशांचं पालन करत आहे. सोबतच मलायकाने फॅन्सना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. आणि फॅन्सचे आभार मानले आहेत. मलायका अरोराआधी अभिनेता अर्जून कपूरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दोघेही लॉकडाऊनपासून एकत्र राहतात. 

मलायका अरोराचा कोरोना रिपोर्ट झाला लीक; अमृता अरोराची सटकली, लोकांवर बरसली

खरंच की काय...या कारणामुळे कधीच होणार नाही अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे लग्न ?

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूड