Join us

Anand Mahindra : जेव्हा राम चरणसह नाटू नाटू वर थिरकतात दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 23:43 IST

महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्राही या गाण्यानंतर स्वत:ला रोखू शकले नाहीत.

'RRR' या चित्रपटातील 'नाटू नाटू’ या गाण्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मीडियावर चाहते या हिट गाण्यावर अद्यापही रिल्स बनवताना दिसत आहेत. या गाण्याला ऑस्कर २०२३ साठी सर्वोत्कृष्ट संगीताच्या यादीत नामांकन मिळाले आहे. दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख (Mahindra And Mahindra) आनंद महिंद्राही या गाण्यानंतर स्वत:ला रोखू शकले नाहीत. अभिनेता राम चरण याच्याकडून नाटू नाटू या गाण्याच्या काही स्टेप्स शिकताना ते दिसले. या दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ही पोस्ट ११ फेब्रुवारी रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून या व्हिडीओला २.२ मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेअर्सही मिळाले आहेत. 

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर राम चरणने एक कमेंट केली आहे. आनंद महिंद्राजी तुम्ही माझ्यापेक्षाही अधिक तेजीने मुव्ह्स केल्यात. खूप चांगला संवाद होता. आरआरआर चित्रपटाच्या टीमला दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद, असे तो म्हणाला.

टॅग्स :आनंद महिंद्राबॉलिवूडराम चरण तेजा