Join us

Mahhi Vij Corona Positive : माही विज कोरोना पॉझिटिव्ह; लक्षणं सांगत म्हणाली, पुर्वीपेक्षाही अधिक खतरनाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:47 IST

जय भानुशालीची पत्नी आणि अॅक्ट्रेस माही विजने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. याच बरोबर हा कोरोना अत्यंत घात आहे, असा हॅशटॅगही दिला आहे.

कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. हा व्हायरस सेलिब्रिटींपर्यंत पोहोचला असून टीव्ही अभिनेत्री माही विजला कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात, माही विजने एक व्हिडिओ पोस्ट करत लोकांना सतर्क केले आहे. तसेच, पूर्वीच्या तुलनेत यावेळी कोरोना अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे. माहीला यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती. यावेळी तिने कोरोनाची अशी लक्षणे सांगितली आहेत, जी मागच्या वेळी नव्हती. तिने स्वतःला मुलांपासून दूर ठेवले असून, आपण त्यांना अत्यंत मिस करत आहोत, असेही तिने म्हटले आहे.

माहीने सांगितली लक्षणं - जय भानुशालीची पत्नी आणि अॅक्ट्रेस माही विजने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. याच बरोबर हा कोरोना अत्यंत घात आहे, असा हॅशटॅगही दिला आहे. व्हिडियो मध्ये  माही म्हणते, मी कोविड पॉझिटिव्ह आहे. मला 4 दिवस झाले आहेत. माझा निकाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. मी लक्षणे दिसताच टेस्ट करून घेतली. सर्व जण म्हणत होते, की करण्याची आवश्यकता नाही, फ्लू आहे, वातावरणामुळे आहे. पण घरात मुले असल्याने मला सुरक्षित राहायचे होते. माझी कोरोना टेस्ट करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली. मला प्रचंड बॉडी पेन होत होते. महत्वाचे म्हणजे, माझी हाडे खूप दुखत होती. हा कोविड पूर्वीपेक्षा अधिक वाईट आहे. मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. असा तास यापूर्वी कोरोनात झाला नव्हता."

या सिलेब्सना झालाय कोरोना - याच बरोबर, माहीने लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, मुलांपासून दूर राहावे लागत असल्याने आपल्याला खूप रडायला येत आहे, तिची मुलगी तिची आठवण काढते. तारा आणि खुशी आठवन काढतात फार वाईट वाटते,असेही तिने म्हटले आहे. यापूर्वी, पूजा भट्ट, एमएम किरवानी, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनकोरोना वायरस बातम्या