बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. महेश मांजेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं गेलं आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता सिनेमा पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी १९ लाख रुपये इतकी कमाई केली होती. पहिल्या दिवशी सिनेमाला फार कमाई करता आली नसली तरी वीकेंडला या सिनेमाने जवळपास १ कोटीपर्यंत कमाई केली होती. शनिवारी म्हणजेच 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ५२ लाखांचा गल्ला जमवला. तर रविवारी सिनेमाला ४६ लाख रुपये कमाई करता आली. सोमवारी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसत आहे. या सिनेमाने सोमवारी १० लाख रुपयांची कमाई केली आहे. चार दिवसांत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' बॉक्स ऑफिसवर १.२७ कोटींचा गल्ला जमवला आहे.
दरम्यान, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बजेट हे १३ कोटी आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ जाधव, मंगेश देसाई, पृथ्विक प्रताप, रोहित माने, सयाजी शिंदे, शशांक शेंडे, बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Web Summary : Mahesh Manjrekar's 'Punha Shivajiraje Bhosale', addressing farmer suicides, earned ₹1.27 crore in four days. The movie made ₹19 lakh on its opening day, with weekend collections hitting ₹1 crore. Siddharth Bodke stars as Shivaji Maharaj.
Web Summary : महेश मांजरेकर की 'पुन्हा शिवाजीराजे भोसले', किसान आत्महत्याओं को संबोधित करते हुए, ने चार दिनों में ₹1.27 करोड़ कमाए। फिल्म ने पहले दिन ₹19 लाख कमाए, सप्ताहांत संग्रह ₹1 करोड़ तक पहुंच गया। सिद्धार्थ बोडके शिवाजी महाराज के रूप में हैं।