Join us

महेश कोठारेंचा नातीसोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 13:32 IST

महेश कोठारेंचा नात जीजासोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून मराठीमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा आदिनाथने देखील अभिनयसृष्टीत नाव कमावले आहे. महेश कोठारे कधीही कोणत्या समारंभात, पार्टीत आपल्या कुटुंबासोबतच दिसतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी निलीमा, मुलगा आदिनाथ आणि सून उर्मिला कोठारे आवर्जून असतात.

आता त्यांच्या घरात आणखीन एका व्यक्तीची एन्ट्री झाली असून ती व्यक्ती म्हणजे त्यांची नात जीजा. महेश कोठारेंचा नात जीजासोबतचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

महेश कोठारे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नात जीजासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत महेश कोठारे व जीजा स्विमिंग पूलमध्ये मज्जा करताना दिसत आहेत.

महेश कोठारेंशिवाय त्याची सून म्हणजेच अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने इंस्टाग्राम स्टोरीवर महेश कोठारे व जीजाचे स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत त्या दोघांसोबत उर्मिलाही दिसते आहे.

हा फोटो पुण्यातील एका पंचातारांकित हॉटेलमधील स्विमिंग पुलमधील आहे. त्यातील एका फोटोमध्ये नात आजोबांसोबत मज्जा करताना दिसते आहे. 

आदिनाथ कोठारे सध्या लंडनमध्ये ८३ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आदिनाथ पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करताना दिसणार आहे.  ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केलेल्या पाणी या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे.

टॅग्स :महेश कोठारेआदिनाथ कोठारेउर्मिला कानेटकर कोठारे