Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुडन्यूज! अरुण कदम झाले आजोबा, अभिनेत्याच्या लेकीने दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 13:00 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदमांची नवी इनिंग सुरू झाली आहे. ते आजोबा झाले आहेत. त्यांच्या लेकीन बाळाला जन्म दिला आहे.

कसोटीचा अभिनय आणि उत्तम विनोदबुद्धीच्या जोरावर अरुण कदम यांनी मराठी सिनेसृष्टीत त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून विनोदाचं अचूक टायमिंग साधत ते प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अरुण कदम यांची नवी इनिंग सुरू झाली आहे. अरुण कदम आजोबा झाले आहेत. अरुण कदम यांची लेक सुकन्या हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

अरुण कदम यांनी काही दिवसांपूर्वीच लेकीच्या डोहाळजेवणाचे फोटो शेअर करत आजोबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. आता आजोबा झाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. छोट्या चिमकुल्याचं आगमन झाल्याने कदम कुटुंबीयांच्या घरी आनंदी आनंद आहे. सुकन्याच्या डोहाळेजेवणाप्रमाणेच तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिने नऊवारी साडी नेसून पारंपरिक पद्धतीने मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं.

“आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

अरुण कदम यांची लेक सुकन्या पेशाने ग्राफिक डिझायनर आहे. तिने डिसेंबर २०२१मध्ये सागर पोवळेबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दीड वर्षांनी आईबाबा होणार असल्याची गोड बातमी त्यांनी चाहत्यांना दिली होती. पुत्ररत्नाच्या प्राप्तीने ते दोघेही आनंदी आहेत.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेताटिव्ही कलाकार