Hemant Dhome on Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाही. बारामतीमध्ये भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक अध्याय अकाली संपला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर,प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दादांच्या जाण्याने झालेली हानी भरून येणारी नाही, अशा शब्दांत त्याने आपला शोक व्यक्त केला आहे.
भीषण अपघात आणि राज्यावर ओढवलेला प्रसंग
बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले आणि त्याने पेट घेतला. या भीषण विमान अपघातात अजित पवारांना आपले प्राण गमवावे लागले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. असा नेता असा अचानक निघून जाईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, पुणे शहरासह अनेक भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला. गुरुवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
"महाराष्ट्राला ही हानी कळायला वेळ लागेल"- हेमंत ढोमे
अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर हेमंत ढोमे याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर श्रद्धांजली वाहिली. "पुष्पगुच्छ नाही तर कामांचे अर्ज आल्यावर खुष होणारा आमचा दादा… Paid PR मुळे नाही तर, गावच्या पारावर लोकप्रिय असणारा आमचा दादा. पुरोगामी महाराष्ट्राची तुमच्या जाण्याने काय हानी झालीय हे कळायला या महाराष्ट्राला जरा वेळ लागेल. सगळेच टाकतायेत म्हणून स्टेटस टाकणाऱ्यांना नेमकं कळायला थोडा वेळ लागेल. तुमच्या असण्याने काय झालं हे तुमच्या तुमच्या नसण्याने कळणार आहे. मी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन येतो. दादा नावाचा आमचा कुटुंब प्रमुख काय होता हे बाकीच्यांना सांगितलं तरी नाही कळणार… आमचा विकास प्रमुख आज अनंतात विलीन झाला," असं हेमंत ढोमे म्हणाला.
“एकच वादा… अजितदादा…” ही घोषणा मात्र आमच्या मनात कायम राहणार कारण दादा जे बोलला ते दादा ने केलं आणि नेमकं काय केलं हे मिडीया ने नाही दाखवलं तरी आम्हाला माहिती आहे. पिंपरी चिंचवड, बारामती, पुणे हे तर आहेच पण एकदा आमच्या गावच्या रस्त्यावरून जा… नदीच्या पाण्याकडे बघा… आमची बहरणारी पिकं बघा… दूध डेऱ्यांमधे जा… पतसंस्था बघा… काय काय सांगू… यादी संपणार नाही… आम्हा शेतकऱ्यांचा रांगडा आधार आज या मातीत कायमचा विसावला… दादा we love you and we will be grateful forever! आम्हा पुढच्या पिढ्यांना नक्की सांगू ‘दादा’ आमच्यासाठी काय होता… ते पण तुमच्या रांगड्या भाषेत… NO FILTER," असंही हेमंत ढोमेने म्हटलं.
Web Summary : Actor Hemant Dhome mourns Ajit Pawar's sudden demise in a plane crash. He highlights Pawar's popularity beyond PR, his dedication to rural development, and lasting impact on Maharashtra's progress, especially for farmers, emphasizing his unfiltered approach and irreplaceable role.
Web Summary : अभिनेता हेमंत ढोमे ने विमान दुर्घटना में अजित पवार के आकस्मिक निधन पर शोक व्यक्त किया। उन्होंने पवार की लोकप्रियता, ग्रामीण विकास के प्रति समर्पण और महाराष्ट्र की प्रगति पर स्थायी प्रभाव, विशेषकर किसानों के लिए, उनके स्पष्ट दृष्टिकोण और अपूरणीय भूमिका पर प्रकाश डाला।