Join us
Daily Top 2Weekly Top 5

64 व्या वर्षी मॅडोना पुन्हा पडली प्रेमात; 'या' 29 वर्षीय व्यक्तीला करतेय डेट, दोनदा तुटलंय लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 14:46 IST

मॅडोना ही जगातील सर्वात लोकप्रिय पॉप सिंगर आहे. मॅडोना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रसिद्ध गायिका मॅडोना आणि बॉक्सिंग ...

मॅडोना ही जगातील सर्वात लोकप्रिय पॉप सिंगर आहे. मॅडोना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रसिद्ध गायिका मॅडोना आणि बॉक्सिंग प्रशिक्षक जोश पॉपर एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दोघांच्या वयात खूप अंतर असल्यामुळे दोघांचे हे नातेही चर्चेत आले आहे. मॅडोना 64 वर्षांची आहे, तर जोश 29 वर्षांचा आहे. यूके-आधारित आउटलेट डेलीमेल 'पेज सिक्स' ला सूत्रांनी सांगितले की, जोश पॉपर मॅडोनाच्या सहा मुलांपैकी एकाला न्यूयॉर्क शहरातील त्याच्या जिममध्ये प्रशिक्षण देत आहे.

अलीकडेच मॅडोनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये बॉयफ्रेंड जोशसोबतचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. मॉडेल बॉयफ्रेंड अँड्र्यू डर्नेलपासून विभक्त झाल्यानंतर काही दिवसांनी, मॅडोना आणि पॉपरच्या डेटिंगच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. मॅडोनाने तिच्या करिअरमध्ये अनेक पुरुषांना डेट केले आहे. ऑक्टोबर 1996 मध्ये जेव्हा तिने त्यांच्या पहिल्या मुलाला, लॉर्डेस लिओनला जन्म दिला तेव्हा ती फिटनेस ट्रेनर कार्लोस लिओनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याचवेळी मॅडोनाने तिच्या एका मुलाखतीत कबूल केले आहे की तिला लग्न केल्याचा पश्चाताप होत आहे आणि तोही दोन-दोन.

विशेष म्हणजे मॅडोनाचे पहिले लग्न अमेरिकन अभिनेता-दिग्दर्शक सीन पॅनसोबत झाले होते. हे लग्न 1985 ते 1989 पर्यंत चालले. पॅनशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने 2000 मध्ये अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक गाय रिचीशी लग्न केले. हे लग्न आठ वर्षे टिकले आणि 2008 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मॅडोनाची प्रतिमा सुरुवातीपासूनच एका धाडसी स्त्रीची आहे, जिने स्वतःच्या अटींवर आयुष्य जगले आणि कधीही कोणाचीही पर्वा केली नाही. 64 वर्षीय मॅडोना तिच्या सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते, जे पाहून तिचे चाहतेही आश्चर्यचकित होतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :हॉलिवूड