Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षितनं जुहूमधील फ्लॅट विकून कमावले कोट्यवधी; खरेदी किमतीपेक्षा दुप्पट नफा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:57 IST

माधुरी दीक्षितनं अपार्टमेंट विकून कमावला बंपर नफा; १३ वर्षांपूर्वी घेतला होता फक्त 'इतक्या' किंमतीत, आता किती कोटींना विकला?

Madhuri Dixit Double Profit On Juhu Flat Sale : अनेक अभिनेते अभिनेत्री रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करत असल्याचं तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल. बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आता  मोठ्या रिअल इस्टेट व्यवहारामुळेचर्चेत आहे. माधुरी दीक्षितनं मुंबईतील जुहूमधील आपल्या एका फ्लॅटची विक्री करुन बंपर नफा कमावला आहे. 

 माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी मुंबईतील पॉश जुहू परिसरातील आपला एक फ्लॅट तब्बल ३.९० कोटी रुपयांना विकला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारामुळे माधुरीला खरेदी किमतीच्या तुलनेत जवळजवळ ९९.२२% नफा मिळाला आहे. रिअल इस्टेट डेटा अ‍ॅनालिटिक्स फर्म 'CRE मॅट्रिक्स'ने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार हा व्यवहार नुकताच पूर्ण झाला आहे.

माधुरीने हा फ्लॅट १३ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये अवघ्या १.९५ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज तो दुप्पट किमतीला विकला गेला आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी या व्यवहाराची नोंदणी झाली. जुहूच्या आयरिस पार्कमधील दीप वर्षा सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या चौथ्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. या फ्लॅटचा ७८०.१३ चौरस फूट कार्पेट एरिया आहे. हा फ्लॅट एका महिलेने खरेदी केला असून, त्यांनी १९.५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. महाराष्ट्र सरकारने महिला घर खरेदीदारांना मुद्रांक शुल्कात दिलेल्या १% विशेष सवलतीचा फायदा त्यांना या व्यवहारात मिळाला आहे.

जुहू हा केवळ माधुरीचाच नाही, तर अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांचा आवडता परिसर आहे. कोस्टल रोड प्रकल्प आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे येथील मालमत्तांच्या किमती गेल्या दशकात गगनाला भिडल्या आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांचे जलसा, प्रतीक्षा आणि जनक हे प्रसिद्ध बंगले याच भागात आहेत. या परिसरात अजय देवगण आणि काजोल यांचाही 'शिवशक्ती' बंगलाही आहे. तसेच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार जुहूतील ‘प्राइम बीच’ या इमारतीत एका भव्य आणि आलिशान डुप्लेक्समध्ये राहतो. समुद्रकिनाऱ्यालगत असलेले हे घर आधुनिक सुविधांनी सज्ज आणि प्रशस्त आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Madhuri Dixit Earns Millions Selling Juhu Flat; Double Profit!

Web Summary : Madhuri Dixit sold her Juhu flat for ₹3.90 crore, nearly doubling her initial investment. Purchased in 2012 for ₹1.95 crore, the 780 sq ft flat sale highlights lucrative real estate gains in Bollywood's favored Juhu locality.
टॅग्स :माधुरी दिक्षितमुंबईबॉलिवूड