Join us  

'इथे मरायला वेळ कोणालाय?' मधुरा वेलणकरच्या बटरफ्लायचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:11 AM

Butterfly: स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मेघाचा थक्क करणारा प्रवास

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात मधुरा वेलणकर हिच्या बटरफ्लाय या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. संसारगाड्यात रमलेल्या होममेकरच्या स्वप्नांची गोष्ट या सिनेमातून उलगडण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यामध्येच आता या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

हाऊस वाईफ ते होममेकर असा प्रवास करणाऱ्या मेघाचा (मधुरा वेलणकर) प्रवास दाखवण्यात आला आहे. प्रत्येक घरातली होममेकर आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र धडपडत असते. पण तिचीही काही स्वप्नं असतात.  कामाच्या धावपळीत तिची स्वप्नं मागे पडतात. पण एक दिवस मेघाच्या आयुष्यात एक अशी रंजक गोष्ट घडते  ज्यामुळे तिचं दैनंदिन आयुष्य बदलून जाते. तिला  सापडलेल्या एका नवीन वाटेला आणि स्वतःला ती  अधिक प्राधान्य देते. आयुष्याला लखलख लाइटिंग झाल्यामुळे, कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट म्हणजेच "बटरफ्लाय" असं या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी 'बटरफ्लाय' चित्रपट प्रस्तुत केला आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी बटरफ्लाय या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत.  हा सिनेमा येत्या २ जून रोजी प्रदर्शित होत आहे. 

टॅग्स :सिनेमामधुरा वेलणकरसेलिब्रिटीमहेश मांजरेकर