Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्यताने संजय दत्तचा फोटो केला शेअर, सांगितलं - परिवार कसा करतोय अडचणींचा सामना....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 15:56 IST

'शमशेरा' सिनेमाचं शूटींगही त्याने सुरू केलंय. दरम्यान त्याची पत्नी मान्यता दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, त्यांचा परिवार कशाप्रकारे अडचणींचा सामना करत आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त फुप्फुसाच्या कॅन्सरसोबत लढत आहे. तसेच सध्या त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. गेल्या ११ ऑगस्टला संजय दत्तने त्याला कॅन्सर झाल्याची बातमी फॅन्सना सांगितली होती. अशात आता उपचार सुरू असतानाही संजय दत्त त्याची राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्नात आहे. 'शमशेरा' सिनेमाचं शूटींगही त्याने सुरू केलंय. दरम्यान त्याची पत्नी मान्यता दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, त्यांचा परिवार कशाप्रकारे अडचणींचा सामना करत आहे.

मान्यता दत्तने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने संजय दत्तचा एक फोटोही शेअर केलाय. यात संजय दत्त काळा चष्मा लावून फोटोसाठी पोज देताना दिसतोय. हा घरातच काढलेला फोटो आहे. या फोटोसोबत मान्यता दत्तने एक कॅप्शन दिलं असून त्यात त्यांचा परिवार कशाप्रकारे अडचणींचा सामना करत आहे हे सांगितलंय. 

मान्यताने संजय दत्तच्या फोटोसोबत लिहिले की, ''रुक जाना नहीं तू कहीं हार के... कांटों पे चलके मिलेंगे साए बहार के!! हमें अपनी जिंदगी के बुरे दिनों का सामने करके बेहतर दिनों को कमाना पड़ता है!! कभी हार नहीं मानना चाहिए!!'. तर मान्यताने  #inspiration #courage #strength #love #grace #positivity #dutts #challenging Yet #beautifullife #thankyougod या हॅशटॅगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यात.

काही दिवसांपूर्वीच मान्यता एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, 'कधी कधी आपल्याला गप्प बसावं लागतं, कारण कोणतेही शब्द हे व्यक्त करू शकत नाहीत की, तुमच्या डोक्यात आणि मनात काय सुरू आहे'. संजय दत्तला कॅन्सरचं निदान झाल्यावर मान्यताने स्टेटमेंट जारी केलं होतं. त्यात ती म्हणाली होती की, 'माझी संजूच्या फॅन्सना विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये. माझी इच्छा आहे की, सर्वांनी सपोर्ट आणि प्रेम करत रहा'.

कॅन्सरशी झुंज देत असलेला संजय दत्त कामावर परतणार, घेतला हा मोठा निर्णय

टॅग्स :संजय दत्तमान्यता दत्तबॉलिवूड