Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 09:37 IST

'लव्हयापा' सिनेमाचा धमाल ट्रेलर काल रिलीज झाला आहे. सिनेमाची कहाणी एकदम हटके असलेली दिसते

काहीच दिवसांपूर्वी खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चं टायटल ट्रॅक काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. या गाण्यातील खुशी आणि जुनैदच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं. दोघांची नवी रोमँटिक जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता काल मुंबईत 'लव्हयापा' सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. यावेळी जुनैदचे वडील आणि अभिनेता आमिर खानही उपस्थित होता. 'लव्हयापा'च्या धमाल ट्रेलरमध्ये आताच्या कपल्सची हटके कहाणी दिसतेय.

'लव्हयापा'च्या ट्रेलरमध्ये काय

Zen Z जनरेशनची हटके प्रेमकहाणी 'लव्हयापा'च्या ट्रेलरमध्ये दिसते. ट्रेलरमध्ये दिसतं की, गौरव आणि बानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. दोघं लग्न करण्याचा निर्णय घेतात. परंतु कहानी में ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा बानीचे वडील दोघांसमोर एक अट ठेवतात. दोघांनी एका दिवसासाठी एकमेकांचे फोन एक्सचेंज करावे, अशी ती अट असते. त्यानंतर गौरव आणि खुशीला एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी कळतात. त्यामुळे त्यांच्या लव्ह लाइफमध्ये मीठाचा खडा पडतो. या दोघांचं लग्न होतं की नाही, हे सिनेमा आल्यावरच कळेल.

'लव्हयापा' कधी होतोय रिलीज?

'लव्हयापा' सिनेमात आमिर खानचा लेक जुनैद खान, श्रीदेवीची लेक खुशी कपूर आणि आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका दिसतेय. याशिवाय कॉमेडियन किकू शारदाही सिनेमात खास भूमिकेत दिसतोय. जुनैद-खुशी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 'लव्हयापा' सिनेमात नव्या पिढीची अतरंगी प्रेमकहाणी  बघायला मिळणार आहे. हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ७ फेब्रुवारीला रिलीज होतोय.

टॅग्स :खुशी कपूरआशुतोष राणाबॉलिवूड