Join us

म्हणून ”लव यु जिंदगी” सिनेमाला मिळतेय प्रेक्षकांच्या पसंतीची पावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 08:00 IST

मनोज सावंत दिगदर्शित “लव यु जिंदगी” चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत असल्याने माऊथ पब्लिसिटीच्या भरवशावर  'लव यु जिंदगी'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय.

ठळक मुद्देया सिनेमाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतंयमध्यंतरानंतर सिनेमा  वेगळं वळण घेतो

माऊथ पब्लिसिटीची ताकद पुन्हा एकदा समजून येतेय. एसपी प्रॉडक्शन्स निर्मित, मनोज सावंत दिगदर्शित “लव यु जिंदगी” चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत असल्याने माऊथ पब्लिसिटीच्या भरवशावर  'लव यु जिंदगी'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या आठवड्यात हिंदीतील मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानादेखील लव यु जिंदगीला मराठी प्रेक्षकांनी उचलून धरले. या सिनेमाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतंय. मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर अधिकाधिक कमाई करतोय हे मराठी सिनेमाच्या भविष्यासाठी चांगली गोष्ट आहे. 

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी चित्रपट बघितल्यावर सिनेमाचं आणि दिग्दर्शक मनोज सावंत यांचं खूप कौतुक केलं. सिनेमा अगदी ‘पॉलिश्ड’ झाला असून तो चित्रपट दिग्दर्शक म्हणून मनोज सावंत यांचा प्रथम सिनेमा आहे असं बिलकुलही वाटत नाही निहलानी म्हणाले.अवधूत गुप्ते चित्रपट बघून भारावून गेले. सिनेमा फार मनोरंजक झालाय, सर्व वयोगटातल्या लोकांना हा सिनेमा आवडणार म्हणाले. 

एसपी प्रॉडक्शन्स, सचिन बामगुडे निर्मित लव यु जिंदगी सिनेमा फक्त मराठी माणसालाच नाही तर सब टायटल्ससोबत बघितल्यास जगभरात कोणालाही हा सिनेमा आवडेल यात शंका नाही. सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. मध्यंतरानंतर सिनेमा  वेगळं वळण घेतो.  मध्यंतरानंतर सिनेमा आणखीनच मनोरंजन करतो. प्रेक्षक सिनेमा बघून आल्यावर भारावलेल्या अवस्थेत बाहेर येताय. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. अनेक वेबसाईट्स, वर्तमानपत्रे सिनेमाला हाय रेटिंग देताहेत. 

सचिन पिळगावकरांचा निरागस सुरेख अभिनय, कविता लाड मेढेकर यांचं रुपेरी पडद्यावरील पुनरागमन सिनेमात जबरदस्त झालंय. दोघांनीही चित्रपटाला अप्रतिम टच दिलाय. प्रार्थना बेहरे सिनेमात खूप सुंदर दिसली आहे. तिच्या अभिनयामुळे तिने चित्रपटातील तिच्या रिया या पात्राला उंचीवर नेऊन ठेवलंय. शिवाय अतुल परचुरे, समीर चौघुले यांच्या अभिनयाचं कौतुक होतंय.

सर्वसामान्य गृहिणीला, आजच्या आधुनिक मुलीला ‘रिलेट’ करता येईल अशा भूमिका सिनेमात कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांनी केल्या आहेत. सचिन पिळगावकर यांनी साकारलेले चित्रपटातील अनिरुद्ध दातेचे दोन्ही रूपे प्रत्येक माणसाला स्पर्श करेल. हा सिनेमा प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे लव यु जिंदगी आज इतर चित्रपटांच्या भाऊगर्दीत बॉक्स ऑफिसवर कमाई करतोय. याशिवाय प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतोय. एसपी प्रॉडक्शन्स, सचिन बामगुडे निर्मित, मनोज सावंत दिग्दर्शित संपूर्णपणे कौटुंबिक मनोरंजक सिनेमा लव यु जिंदगी महाराष्ट्रभर धूम करतोय हे मराठी सिनेमाच्या भविष्यासाठी अत्यंत चांगलं आहे. मराठी सिनेरसिकांनी  लव यु जिंदगी या मराठी सिनेमाला अश्याच प्रकारे  प्रेम आणि पाठिंबा देणं आवश्यक आहे.

टॅग्स :लव्ह यु जिंदगीसचिन पिळगांवकरकविता लाडप्रार्थना बेहरे