Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nehha Pendse's Wedding : नेहा पेंडसेच्या लग्नातील मेन्यू पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी, पदार्थ पाहून म्हणाल अबब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 11:23 IST

Nehha Pendse-Shardul Singh Bayas wedding's Wedding :अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नातील जेवणाच्या थाळीचा फोटो पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा ५ जानेवारीला शार्दुल सिंग बयास याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. पुण्यात मराठमोळ्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. बिग बॉस १२ ची स्पर्धक राहिलेल्या नेहाने आपल्या लग्नात महाराष्ट्रीयन लूक केला होता. इतकंच नाही तर लग्नात जेवणाच्या मेन्यूतही महाराष्ट्रीयन पदार्थांना पसंती दिली होती. 

नेहाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. त्यात तिच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतल्या तिच्या मित्रमंडळींनीदेखील हजेरी लावली होती. त्यांनी देखील नेहाच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावरील स्टोरी व पोस्टमध्ये शेअर केले आहे.

त्यात अभिनेत्री हेमांगी कवी हिने इंस्टा स्टोरीमध्ये चक्क लग्नातील मेन्यूचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने पदार्थांच्या नावांसोबत म्हटलं की, अबब! कमाल बेत नेहा. दमलो की गं आम्ही जेवून. 

नेहा व शार्दुलच्या लग्नात मेन्यूमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी होती. यात पुरणपोळी, पुरी, चपाती, टोमॅटो सूप, डाळिंबी उसळ, भरली वांगी, कढी, बटाट्याची भाजी, शेपूची भाजी, अंबाडीची भाजी, भाकरी, पिठलं, वरण भात, मसाले भात, अळूवडी, कोथिंबीर वडी, मठ्ठा, बासुंदी, रसमलाई, पापड व लिंबूचे लोणचे या पदार्थांचा समावेश होता. हे पदार्थ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. 

नेहाचा पती शार्दुल हा महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबातील आहेत. लग्नाआधी दीर्घकाळ नेहा व शार्दुल एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

लग्नाच्या एक दिवस अगोदर नेहाचा साखरपुडा झाला. तिथेच संगीत सेरेमनीमध्येही नेहा आणि शार्दुलने मस्ती केली. या दोन्ही फंक्शनचे फोटो नेहाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

नेहाबद्दल सांगायचे तर तिने नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

लवकरच ती ‘जून’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत झळकणार आहे. या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :नेहा पेंडसेहेमांगी कवी