मुंबई: चित्रपट आणि डिजिटल यांच्यातली रेषा आता पुसट होत जात आहे. त्यामुळेच मला येत्या काळात डिजिटल माध्यमात काम करायला आवडेल, असं म्हणत अभिनेत्री दीपिका पादुकोणनं तिच्या भविष्यातील योजना लोकमतसोबत शेअर केल्या. लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याला दीपिका पादुकोण उपस्थित होती. यावेळी लोकमत मीडिया ग्रुपचे जॉईंट एमडी आणि एडिटोरियल डायरेक्टर ऋषी दर्डांनी तिच्यासोबत संवाद साधला. व्यावसायिक आणि समांतर चित्रपटांमधली रेषा हळूहळू पुसट होत आहे, असं मत दीपिकानं व्यक्त केला. यावेळी तिनं आगामी चित्रपट छपाकबद्दल भाष्य केलं. छपाकमधील भूमिका साकारणं अतिशय अवघड होतं. ती भूमिका मी अतिशय मनापासून साकारली आहे. त्यामुळे चित्रिकरण संपूनदेखील आजही ती भूमिका मला माझ्यात जाणवते. अद्यापही ती भूमिका मी विसरु शकलेले नाही, असं दीपिकानं सांगितलं.
Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 00:14 IST