Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दाढेतून परतली लारा दत्ता, शूटिंग करताना समुद्रात बुडता बुडता वाचलेली अभिनेत्री, अक्षय कुमार होता म्हणून निस्तरलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:41 IST

"जहाजावर अक्षयचं डोकं आपटलं अन्...", लारा दत्ताने सांगितला अंदाजच्या  सेटवरील प्रसंग, काय घडलेलं? 

Lara Dutta: मिस युनिव्हर्स, अभिनेत्री लारा दत्ता हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका आहे.  जवळपास दोन दशकांहून अधिक काळ ती सिनेसृष्टीत सक्रिय आहे. लाराने २००३ मध्ये आलेल्या अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अक्षय कुमार, प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमारसोबत तिने स्क्रिन शेअर केली. चित्रपटातील लाराच्या सौंदर्याने प्रेक्षकांना अक्षरश:भुरळ घातली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लाराने या चित्रपटाच्या सेटवर घडलेला भयानक अनुभव सांगितला.

अंदाज चित्रपटाचं शूटिंग करताना ती थोडक्यात वाचली. विशेष अभिनेता अक्षय कुमारमुळे तिचा जीव वाचला होता. असं तिने यावेळी सांगितलं. लारा दत्ता एशियन टेलिव्हिजन नेटवर्क कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत तो प्रसंग शेअर करत म्हणाली, चित्रपटातील एका डान्स सीनची शूटिंग सुरू होती.सर्वकाही सुरळीत सुरू होते. मी गाण्याच्या एका सीनसाठी पाण्यात गेले. मात्र, मला  पोहता येत नव्हतं. त्यावेळी मी लेदरचे कपडे घातले होते. मी एखाद्या दगडाप्रमाणे खाली जात होते."

त्यानंतर लारा दत्ता या घटनेविषयी अभिनेत्री म्हणाली, "त्यावेळी जर अक्षय कुमार नसता तर स्थिती खूप जास्त भयंकर स्थिती असती. मी खाली जात असताना अचानक अक्षयने मला पकडलं. या घटनेमुळे मला हायपोथर्मिक शॉक बसला होता. शूटिंग थांबवून मला रुग्णालयात नेण्यात आलं."

"त्यानंतर मला चित्रपट ब्लू मिळाला पण त्यामध्येच समुद्राच्या आत जाऊन शूटिंग करायची असल्याने मी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यावेळी मी अक्षयला फोन करून सांगितलं की मी हा चित्रपट करू शकत नाही.त्यावर अक्षयने थेट मला पोहोयला शिक असा सल्ला दिला. ३० व्या त्याने मला डायव्हिंग शिकायला सांगितलं." असा खुलासा तिने केला. 

लारा दत्ता वयाच्या ३० व्या वर्षी ती पोहायला शिकली. त्यानंतर भीतीवर मात करत ब्लू फिल्म सिनेमात काम करण्यासाठी होकार दर्शवल . अँथनी डिसूझा दिग्दर्शित हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता.हा चित्रपट प्रचंड गाजला होता. ज्यामध्ये पाण्यात खऱ्या शार्क माशांसोबत काही सीन्स शूट केले गेले होते. क्लायमॅक्सच्या वेळी अक्षय कुमार स्वतः मरणाच्या दारातून परत आला. पाण्याखाली १५० फूट खोल एका बुडलेल्या जहाजावर त्याचे डोकं आपटलं आणि रक्तस्राव होऊ लागला. पण, तो  प्रयत्न करून पाण्याच्या वर आला. असा एक भयानक प्रसंद देखील तिने सांगितला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lara Dutta's near-death experience saved by Akshay Kumar during filming.

Web Summary : Lara Dutta recounted a terrifying incident during 'Andaaz' filming where she nearly drowned. Akshay Kumar saved her. She later overcame her fear of water, learned diving and worked in 'Blue'.
टॅग्स :लारा दत्ताअक्षय कुमारबॉलिवूडसिनेमा